
सातारा : ग्रामपंचायत म्हणजे गावची संसद…आजवर सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना स्वतःची वेगळी ग्रामपंचायत इमारत नव्हती त्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व मान्यवर पदाधिकारी,यांच्यामार्फत माझ्याकडे कागदपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला होता. काल दिनांक 11 जुलै 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील तब्बल 35 स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
“मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी” योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एकूण 35 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
यामध्ये माण तालुक्यातील वावरहिरे, हस्तनपुर, शिंदि_खुर्द, खडकी, चिलारवाडी, बोडके, शेणवडी,
खटाव तालुक्यातील कणसेवाडी, मोराळे, राजापूर, विसापूर,
जावली तालुक्यातील आनेवाडी, ओखवडी, एकीव,
कराड तालुक्यातील धावरवाडी, भुयाचीवाडी, खराडे, चचेगाव, गोळेश्वर, कालवडे, कापिल, कुसुर,
सातारा तालुक्यातील झरेवाडी, भाटमरळी, फत्त्यापूर, अंगापूर (तारगाव),
कोरेगाव तालुक्यातील बोरगाव, भावेनगर,विखळे, पिंपोडे खुर्द , ल्हासुर्ने
फलटण तालुक्यातील काळज, विंचुर्णी, आंदरुड इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र असे पर्यावरणपूरक आणि स्मार्ट ग्रामपंचायत कार्यालय उभारले जाणार आहे.