ताज्या बातम्याराजकियराज्य
जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधकांना टोला लगावत वाचाळवीरांना सुबुद्धी येवो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी ईश्वराकडे जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याचे बळ मागितले.
सोमवारी नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “ज्या जनतेच्या अपेक्षा असतात त्याच आमच्यादेखील असतात. त्यामुळे नवीन वर्षात लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पुर्ण करता याव्यात, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे,” असे ते म्हणाले. तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशीही प्रार्थना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.