
कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच कराड उत्तर मधील काही गावांना 1 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर केला असल्याने या निधीमुळे अनेक कामे मार्गी लागणार आहेत. पृथ्वीराज बाबांच्या भक्कम साथीमुळे कराड उत्तर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे. असे मत कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात यांनी व्यक्त केले.
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कराड उत्तर मध्ये ज्या गावामध्ये पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून 1 कोटी 26 लाख रुपये इतका निधी मिळाला आहे या गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज बाबांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले यावेळी कराड उत्तर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज बाबांचा सत्कार केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कराड उत्तर विधानसभा हा माझ्या लोकसभा मतदार संघातील एक मतदार संघ होता. या भागाने वेळोवेळी मला व माझ्या मातोश्री प्रेमीलाकाकी यांना भरघोस मतांची साथ दिली होती. यामुळेच या भागातील हजारो कार्यकर्ते अजूनही माझ्या नियमित संपर्कात आहेत. निवास थोरात अध्यक्ष झाल्यापासून या भागातील अनेक गावात माझा दौरा आयोजित करून संपर्क साधता आला. मुख्यमंत्री असताना 150 कोटींच्या वर निधी या भागाला देता आला. पण अजूनही शक्य आहे तेव्हा निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. काँग्रेस पक्ष या भागात मजबूत व्हावा पक्ष संघटना वाढावी यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
यावेळी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात म्हणाले कि, कराड उत्तर मध्ये हजारो कार्यकर्ते अजूनही बाबांचे कट्टर समर्थक आहेत पण आघाडी धर्म प्रामाणिक पणाने पाळणारे बाबा यांच्यामुळे कराड उत्तर मधील हजारो कार्यकर्ते बाबांच्या सूचनेनुसारच काम करत आहेत. पण तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांची खदखद बाबांच्या पर्यंत पोहचविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. अध्यक्ष पद मिळाल्यापासून प्रत्येक जि. प. गटात बाबांचे कार्यक्रम लावले यामधून हजारो कार्यकर्ते बाबांना भेटले आणि यामुळे निपचित पडलेली काँग्रेस पुन्हा एकदा चार्ज झाली. आणि आता तर बाबांनी निधी देऊन बूस्टर डोस च आम्हा कार्यकर्त्यांना दिला आहे. बाबांची अशीच साथ मागे राहिली तर कराड उत्तर काँग्रेसमय व्हायला फार वेळ लागणार नाही.
यावेळी कराड उत्तर मधील तासवडे ग्रामपंचायत सदस्य अमित जाधव, इंद्रजित जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, उमेश मोहिते, लहुराज यादव, संजय घाडगे, उमेश मोहिते, नवीन कवठे सरपंच गणेश यादव, विशाल यादव, दादासाहेब मोहिते, सुरेश पाटील, आनंदराव चव्हाण, राजेंद्र पाटील, विशाल मोहिते,जगन्नाथ थोरात, अतुल थोरात, प्रकाश खंडागळे, बानूगडेवाडीचे सचिन बानूगडे आदिसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.