
पाटण ः लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली. सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले.
ते दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजित स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 80 व्या जयंती सोहळया प्रसंगी बोलत होते. यावेळी चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई यांचेसह व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, चेअरमन अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, संचालक शशिकांत निकम, बबनराव शिंदे, प्रशांत पाटील, भागोजी शेळके, शंकरराव पाटील, सोमनाथ खामकर, सुनील पानस्कर, विजय सरगडे, संचालिका सौ. दिपाली पाटील,विजय पवार, जालंदर पाटील, डी. एम. शेजवळ, संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, बबनराव भिसे, विजयराव जंबुरे, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, बशीर खोंदू, विजय शिंदे, आनंदराव चव्हाण, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई, शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते, कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.