मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगे-पाटील यांची सभा

डोंबिवली ः मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभरात दौरे व सभा घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात आज संध्याकाळी जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली.सर्वत्र झेंडे, बॅनर लावण्यात आले असून बॅनर हा चर्चेचा विषय बनला आहे.
कारण कल्याण पूर्वेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे काही बॅनर लागले आहेत यावर चक्क मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक यांचे फोटो आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सभेला शिवसेना शिंदे गटाचा पाठींबा आहे कां? असा सवाल आता उपस्थिती केला जात आहे. त्यामुळे जरांगे यांची मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.