
कराड :- महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जात आहे या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रदर्शनात ज्यांना ज्यांना स्टॉल घ्यायचे आहेत त्यांनी तात्काळ आयोजक कराड उत्पन्न बाजार समितीची संपर्क साधावा असे आव्हान बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे आत्तापर्यंत 90 टक्के स्टॉलची विक्री झाली असून फक्त काही स्टॉलच शिल्लक राहिले असल्याने व्यापाऱ्यांनी तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा.
कराड येथे गेली १८ वर्षे लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे संकल्पनेतून कृषी प्रदर्शन भरविले जाते यावर्षी ही मागील परंपरा जोपासत शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रदर्शन भरविणेची प्रक्रीया सुरु केली आहे हे प्रदर्शन स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरत आहे.
प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल सहभागी होणार असून यातील १०० स्टॉल शेतक-यांच्या कृषी माल विक्रीसाठी मोफत पुरविले जाणार आहेत. प्रदर्शनात ऊस, केळी, भाजीपाला पिक स्पर्धा व प्रदर्शन विविध फळे, फुले स्पर्धा व प्रदर्शन तसेच पशु-पक्षी स्पर्धा व प्रदर्शन भरविले जाणार आहे.
प्रदर्शन सुरू होण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असल्याने स्टॉल खरेदीसाठी झुंबड उडत आहे. तरी कराड शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी तात्काळ आपला स्टॉल बुकिंग करून घ्यावा. बुकिंग साठी 8329447762/ 9503366455 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.