राज्यसातारासामाजिक

कराड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे पत्रकार आरोग्य शिबिर उत्साहात

कराड : पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतः बरोबर स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असून, अपाय होण्याअगोदर उपाय करावा किंवा चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन कराड तहसीलदार विजय पवार यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कराड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांचे वतीने उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते.

यावेळी बोलताना विजय पवार म्हणाले की, लोकशाहीच्या चार स्तंभा पैकी दोन स्तंभ न्यायालय आणि मीडिया असून, जनतेला या दोघांकडून न्याय मिळतो त्यामुळे पत्रकारांचे महत्व अबाधित आहे. त्यांनी आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी सकस आहार आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

३ डिसेंबर हा दिवस मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना मराठी पत्रकार परिषदेची मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिले होते त्या अनुषंगाने रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने सोमवार दि.४ डिसेंबर २०२३ रोजी कराड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांचे वतीने, कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ११ वा. पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते फित कापून धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कराड तहसीलदार विजय पवार, उपजिल्हा रुग्णालय कराड वैद्यकीय अधीक्षक आर. जे. शेडगे ,कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार,कराड तालुका आरोग्य अधिकारी सुनील चव्हाण,जलमृद्ध संधारण उपविभाग कराड अधिकारी करपे, जेष्ठ पत्रकार अशोक चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर, डॉ. नवनाथ चोपडे, दैनिक पुढारी कार्यालय प्रमुख सतीश मोरे, डिजिटल मीडिया पत्रकार परिषद कराड तालुका अध्यक्ष संतोष वायदंडे, उप तालुका अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा संघटक शरद गाडे आदींची उपस्थिती होती.

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार आरोग्य तपासणी दिन शिबिर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे पत्रकाराच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कराड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांच्यावतीने आयोजित पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी अक्षय गुरव डॉ. इंद्रजीत पवार, जालिंदर शिंदे, RBS चे डॉ. संगीता यादव,मेट्रन श्रीमती जानकर मॅडम, ई.सी.जी.च्या साधना यादव एक्स-रे विभागाचे होगाडे या सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी कराड शहर व परिसरातील ४५ पत्रकारांची आरोग्य तपासणी केली.

यामध्ये रक्त लघवी आणि शुगर तपासणी,किडनी, लिव्हर, डोळे कान ,नाक ,दात तपासणी इसीजी त्याचबरोबर एक्स-रेही काढण्यात आला. एचआयव्ही, उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब याबाबत ही तपासण्या करण्यात आल्या.

कराड डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांचा आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम हा अत्यंत चांगला व कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

त्याचबरोबर पत्रकारा समाजाचा आरसा असून पत्रकार यांनी समाजातील चांगल्या कामाचे बातमीचे माध्यमातून कौतुक करावे व समाजात घडणाऱ्या वाईट घटना या समाजापुढे लेखणीतून मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक काम करावे तसेच विकास कामासाठी सहकार्य करावे व ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल, त्या ठिकाणी लेखणीतून आवाज उठवावा पत्रकार समाजासाठी सदैव रस्त्यावर असतो व तो या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याचे ही काळजी घेत नाही.

पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही परिषदेच्या माध्यमातून अशा शिबिराचे आयोजन करत असतो. तसेच मराठी पत्रकार परिषद ही सण १९३९ साली स्थापन झालेली देशातील मराठी पत्रकाराची पहिली संघटना आहे. व यामध्ये गेल्या दहा वर्षापासून पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर हे ३ डिसेंबर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण ३५४ तालुका व ३६ जिल्ह्यात राबविले जाते. यामध्ये गेल्या वर्षी हजारोंच्या वर पत्रकारांची एका दिवशी आरोग्य तपासणी शिबिरात करण्यात आली होती. उपचारासाठी संघटनेचे माध्यमातून आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही नियोजन करत आहोत.
असे असेही, कराड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार परिषद च्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक कर्मयोगी चे खंडू इंगळे, वेध माझा चे पत्रकार अजिंक्य गोवेकर, संतोष शिंदे, महेश सूर्यवंशी, अतुल होनकळसे, दशरथ पवार, संतोष कदम, सुहास कांबळे, वसीम सय्यद, संतोष गुरव, अमोल चव्हाण, सुभाष देशमुख, चंद्रजीत पाटील, दैनिक पुढारीच्या प्रतिभा राजे मॅडम, क्रांती चव्हाण, विकास भोसले, प्रमोद तोडकर, शरीफ तांबोळी, मुस्कान तांबोळी, हैबत आडके, यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपजिल्हा रुग्णालयाचे महेश शिंदे यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close