
कराड : आपले नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे यशवंत विचारांवर चालतात आणि हेच विचार घेऊन आपण राजकारण आणि समाजकारण करणार आहे. पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधीही, कोठेही, कसलीही अडचणी येऊ त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीवर मात करण्याची ताकद कार्यकर्त्यांना देणार असल्याचे विजयसिंह यादव यांनी सांगितले.
कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी युवानेते विजयसिंह यादव (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पाटील-उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर, निवासराव शिंदे, सादिकभाई इनामदार यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
विजयसिंह यादव म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर व कराड दक्षिण मतदार संघात जास्तीत-जास्त निधी आणून विकासाची वाटचाल सुरू ठेवायचे आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकजूट दाखवून मतदार संघाचा कायापलट करूया असेही यावेळी युवानेते विजयसिंह यादव यांनी सांगितले.