राज्यसातारा

कराडसह तालुक्यात आजपासून साखळी उपोषणास सुरूवात

मराठा आरक्षणासाठी तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

कराड ः सकाळ मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र लढा उभारला आहे. त्यासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांनी राज्यातील गावागावात एक डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शुक्रवार, दि. एक डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.

या साखळी उपोषणात मराठा समाजातील जेष्ठ नागरिकांसह तरुण, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांही उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. उपोषणस्थळी आंदोलकांनी एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आधी. घोषणा दिल्या.
दरम्यान, जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवार, दि. 1 डिसेंबरपासून कराड तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये साखळी उपोषणे सुरु झाली आहेत. यामध्ये कृष्णाकाठच्या वडगाव हवेली, कोडोली व खुबी गावामध्ये सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या गावातील गणेश व नवरात्र उत्सव मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उपोषणाचे नियोजन आखले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा तीव्र करत एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारपासून तालुक्यातील वडगाव हवेली, कोडोली व खुबी येथील सकल मराठा समाजाने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, वडगाव हवेली येथील साखळी उपोषणस्थळ कराड-तासगाव मार्गावर रस्त्यानजीक असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे मराठा बांधव सदर उपोषणस्थळी भेट देत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close