ताज्या बातम्याराज्यसातारा

ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

कराडात मनसेचे खळखट्याक आंदोलन ः दादासाहेब शिंगण यांनी इंग्रजी फलक फाडला

कराड : कराड व मलकापूर शहरासह तालूक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाटया काढुन मराठा पाटया लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अध्याप कार्यवाही झाली नसल्याने शनिवार पासून मनसेने खळखटयाक आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी कोल्हापुर नाक्यानजिक असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडला. प्रशासन व दुकानदारांनी तत्काळ कार्यवाही करून मराठी पाटया लावाव्यात अन्यथा हा ट्रेलर आहे काही दिवसांत मनसे पिक्चर दाखवेल असा ईशारा दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे.

मनसेच्या वतीने मराठा पाटयाचे आंदोलन सुरू केल्यानंतर न्यायलयानेही मराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना प्रथम मराठी भाषेत फलक असावा असे आदेश आहेत. असे असतानाही अनेक दुकानांना केवळ इंग्रजी भाषेतच फलक आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कराड शहर व तालुका मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत इंग्रजी पाटयांवर कारवाई करून मराठीत पाटया लावण्याची मागणी केली होती. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा ईशारा दिला होता. मात्र निवेदनानंतरही कराड व मलकापूर शहरातील अनेक दुकानांना केवळ इंग्रजी भाषेतच पाटया आहेत. त्यामुळे मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी शनिवारी येथील कोल्हापुर नाक्यानजीक असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी दादासाहेब शिंगण म्हणाले की, मनसेच्या वतीने प्रथम प्रशासनाला निवेदन देऊन मराठी पाटया लावण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. तर दुकानदारांनाही मराठी पाटया लाऊन महाराष्ट्राची अस्मिती जपण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अध्याप कराड व मलकापूर शहरातील अनेक दुकानदारांनी इंग्रजी पाटया बदललेल्या नाहीत. त्यामुळे आज एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडण्यात आला आहे. शनिवारी झालेले खळखटयाक आंदोलन हा केवळ ट्रेलर आहे. प्रशासन व दुकनदारांनी याची गांभिर्यांने दखल घेऊन मराठी पाटया लावाव्यात अन्यथा लवकरच इंग्रजी पाटया असलेल्या दुकानदारांना मनसेच्या वतीने पिक्चर दाखवण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन दादासाहेब शिंगण यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close