राज्याची अधोगती करण्याचे काम मोदींनी केले
काँग्रेसचे नाना पटोले यांची पंतप्रधानांवर टीका

भंडारा : राज्याची अधोगती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतील हिरे बाजार सूरतमध्ये नेण्यात आला असून तिथे आज शानदार उद्घाटन झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सूरतमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. याला ‘सूरत डायमंड बोर्स’ असेही म्हणतात. या ठिकाणी हिरे व्यापाराचे केंद्र मोठे केंद्र झाले आहे. यापूर्वी हिऱ्याची एकत्रित उलाढाल, व्यापार केंद्र हे अमेरिकेतील पेंटॉगॉनमध्ये होते. मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय सूरतमध्ये स्थलांतरीत केला आहे. त्यावरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्याशिवाय, भाजपमुळेच राज्यातील उद्योग, व्यवसाय गुजरातला वळवले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता.
भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पटोले यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्रात खोक्याचं सरकार आणण्याच्या मागचा तोच उद्देश होता. खोक्याचं सरकार आल्याबरोबर भ्रष्टाचाराच्या आणि दबावानं आलेल्या सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेनसाठी पैसे उपलब्ध करून दिले. नरेंद्र मोदींना असेच अपेक्षित असल्याचा आरोप पटोले यांनी केला. आता मुंबईतल्या सर्व प्रॉपर्टी अदानीला देवून मुंबई अदाणीच्या नावाने करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात ईडी आणि येड्यांचं सरकार आल्यानंतर अनेक उद्योग गुजरातमध्ये गेलेत. राज्यातली अधोगतीचं करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून राज्यात सुरू झालेली आहे, हे आता स्पष्ट झालं असल्याची बोचरी टीका पटोले यांनी केली.