
पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये बांग्लादेशातून भारतात घुसघोरी करून आलेले १० बांग्लादेशी नागरिक पकडले गेले. दरम्यान या घुसखोरांना तातडीने अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
नारायणगावात बांग्लादेशी नागरिक बेकायदा राहात असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी एटीएसच्या पथकाने नारायणगावात धाडी टाकल्या. यावेळी पथकाला ८ बांग्लादेशी नागरिक आढळून आले. हे सर्व नागरिक भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचं चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, एटीएसने या घुसखोरांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देखील यापुर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्य करणार्या बांग्लादेशी महिला आणि पुरुषावर कारवाई करत त्यांना पकडले होते.
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून पुणे शहर यासोबतच जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान पोलिसांकडून या घुसखोरांविरोधात कारवाई केली जात आहे.