राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे वाटोळे करू नये : मनोज जरांगे पाटील

जालना : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी माझा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. तुला मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावायचे असतील तर तुला महाराष्ट्रात फिरायचे नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी आता हे पिल्लू सोडले आहे का?
राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे वाटोळे करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी आता ही नवीन चाल सुरू केली आहे काय? त्यांनाही महाराष्ट्रात हिंडायचे नाही का? असा हल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
घोंगडी बैठकी समस्या आणि एकमेकांचे समस्या सोडवण्यासाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी ही घोंगडी बैठक आहे. आता ही घोंगडी बैठक आमच्या आरक्षणासाठी आहे. शेतकऱ्यांसाठी आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
ईसीबीसीला सहा महिन्यांची मुदत वाढ दिली होती. त्यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी आमचे ईडब्ल्यूएस रद्द केले होते. ईडब्ल्यूएस जशाला तसे ठेवावे अशी मागणी आमची देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. मराठा समाज एसीबीसी, ईडब्ल्यूएस किंवा कुणबी यापैकी कोणते ऑप्शन घेऊ शकतात. कुणबी असलेल्यांना व्हॅलेडीटीसाठी सहा महिन्यांची मुदत दिल्याने आम्ही शंभूराजे देसाई यांचे कौतुक आणि अभिनंदन करतो. असे निर्णय घेतले तर लोक तुमचे कौतुक करतील. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.ज्याप्रमाणे तुम्ही ओबीसी कुणबीसाठी व्हॅलिडीटीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, त्याप्रमाणे मराठा आणि कुणबी एकच आहेत हा अध्यादेशही काढून टाका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी म्हटलं होतं, परंतु सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली. परंतु ती कामच करत नाही मग शिंदे समितीला मुदतवाढ देऊन उपयोग काय? आता आरक्षणाबाबत सरकारने तात्काळ पावले उचलावी आणि ते आरक्षण आम्हाला द्यावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.