केंद्र सरकारचा नागरिकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 25 rupees kg rice केंद्राकडून फक्त 25 रुपये प्रती किलो दराने तांदूळ विकणार आहे.
याआधी केंद्राने भारत नावाच्या ब्रॅण्डचे डाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर ‘भारत’चाच तांदूळ 25 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने, या तांदळाची योग्यरीत्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. याआधी या ब्रॅण्डच्या डाळींची आणि पिठाचीही विक्री सुरू करण्यात आली आहे.
भारत नावाच्या ब्रॅण्डचा 25 rupees kg riceतांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीला एका वरिष्ठ अधिकार्याने दुजोरा दिला. नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल. केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापार्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ 25 रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध करून देत आहे. मात्र, बासमती तांदळाचे भाव 50 रुपये किलोवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करून ठेवणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करून भाव वाढवणार्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे.