क्राइमताज्या बातम्याराज्य

एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात

सहा जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close