
कराड : कराड तहसील कार्यालयात दाखल्यासाठी दिलेल्या रकमेची पावती मागून घ्यावी व जर कोणी ज्यादा रक्कम आकारत असेल तर त्याची तक्रार लेखी स्वरूपात नायब तहसीलदार राठोड यांच्याकडे करावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.
कराड तहसील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे दाखल्यासाठी रोजची गर्दी होत असते. त्यासाठी काहीजणांकडून लवकर दाखल देतो असे सांगून ज्यादा रक्कम उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी तहसीलदार विजय पवार यांनी हे पाऊल उचलले आहे. कराड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, त्यामध्ये सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 53.60 रूपये खर्च येतो त्यासाठी 1 दिवसाचा कालावधी आहे. उत्पन्न दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, अर्ज व स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी आहे. डोमासाईल दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये अर्ज व स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी येतो. शेतकरी दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. डोंगरी दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. अल्पभूधारक दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. ऐपतदार दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 21 दिवसाचा कालावधी आहे. रहिवाशी दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. 30 टक्के महिला आरक्षण दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे. ईडब्लूएस आर्थिक मागास प्रवर्ग दाखल्यासाठी शासन नियमानुसार 33.60 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 63.60 रूपये खर्च येतो. त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी आहे. जातीचा दाखल्यासाठी शासन नियमानुसार 57.20 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 87.20 रूपये खर्च येतो. त्यासाठी 45 दिवसाचा कालावधी आहे. नॉनक्रिमीलेअर दाखल्यासाठी शासन नियमानुसार 57.20 रूपये, स्वघोषणापत्राचे 10 रूपये, सेतू शुल्क 20 रूपये असे एकूण 87.20 रूपये खर्च येतो. त्यासाठी 45 दिवसाचा कालावधी आहे.
याव्यतिरिक्त मराठा कुणबी दाखल्यासाठीही जर कोणी ज्यादा रक्कमेची मागणी केली तरीही नायब तहसीलदार राठोड यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.