तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील
मनोज जरांगे पाटील यांची मंत्री छगन भुजबळांवर सडकून टीका

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे. दुसरीकडे सरकारमधील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सातत्याने विरोध करत आहेत
त्यामुळे शिंदे गटाने छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
तर आज मनोज जरांगे पाटील यांनी एकेरी शब्दांत छगन भुजबळांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ‘तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे. आम्ही ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील. मी तुला सांगतो, तू नादी लागू नकोस. गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करु नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहे. आता हेच ओबीसी बांधव त्याला (छगन भुजबळ) म्हणत आहेत की तू काय कामाचा आहेस? तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सगळे मिळून तुला बाहेर फेकतो.” असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी एकेरीवर येत पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.