ताज्या बातम्याराजकियराज्य
पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय
उद्धव ठाकरे यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग : मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी दिली, पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जनसंपर्क दौऱ्यावर असून त्यांची राणेंच्या बालेकिल्ल्यातही तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जून निवडणूक बाकी आहे पण मी तुम्हाला भेटायला आलो आहे. निवडणुकीला देखील येईन आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईन. उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक खून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील, तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती, असा टोलाही त्यांनी पीएम मोदी यांना लगावला.