राणेंना मानाची पदे शिवसेनेमुळे मिळाली, याचा विसर त्यांना पडू नये : उध्दव ठाकरे

सिंधुदुर्ग : आम्ही कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदीं शत्रू नव्हतो ना असणार आहे, आमचा शत्रू भाजप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही नेत्यावर टीका करणं टाळलं आहे
सत्तांतरानंतर पहिल्यांदा उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्यांची पहिली सभा ही मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघात होत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांवर आक्रमक भूमिका घेतल्यास जिल्ह्यातील सभा उधळून टाकण्यात येईल असा इशारा शिवसेने आणि भाजपकडून देण्यात आला होता. त्यामुळे ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.
उद्धव ठाकरे म्हणाले की ही जनसंवाद यात्रा नाही तर कुटुंब संवाद आहे. मनकी बात आपल्याकडे नाही तर आपली दिलं की बात आहे. मनात राम आणि हाताला काम असं आपल असते. चांदा ते बांदा नाही तर आपण बंद्यापासून सुरुवातं केली. केसरकर यांना पक्षात घेतलं, मंत्री केलं पण गद्दारी नसा नसात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आम्ही मोदीचे शत्रू न्हवतो ना असणार, आमचा शत्रू भाजपा आहे. एकाने मेडिकल कॉलेज उघडलं. त्याला मुख्यमंत्री असताना परवानगी दिली. मला माहित नव्हतं मेडिकल कॉलेज की कोंबड्यांची पोल्ट्री होती, असा टोला नारायण राणेंच नाव न घेता लगावला. लोकसभा मतदार संघ नाही तर कोकण माझं आहे, आज आलो, पुन्हा विजयाची सभा घ्यायला येईल. आजही गोवेकर, श्रीधर नाईक, भिसे हत्या प्रकरण अनुत्तरित आहे. नौदल दिन कोकणात साजरा केला. पंतप्रधान आले. विकासासाठी काही देतील असं वाटलं. पण कोकणातील पाणबुड्या प्रकल्पच घेऊन गेले. मोदी सरकारचा रथ फिरवत आहात, मग भारत सरकारचं नाव मोदी सरकार केलं का? असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आजपर्यंत कोकण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी आहे. जे आज शंका उपस्थित करताहेत त्यांना अनेक मानाची पदे शिवसेनेमुळे मिळाली. त्याचा विसर त्यांना पडला आहे. उद्धव साहेबांचा कोकण दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोच्च होईल. उद्धव साहेब, रश्मी वहिनी हे पहिल्यांदाच माझ्या निवासस्थानी येत आहेत हा माझ्यासाठी सुवर्णदिवस आहे. उद्धव साहेबांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा अधिकार राणे किंवा अन्य कोणालाही नाही. राणेंना मानाची पदे शिवसेनेमुळे मिळाली, याचा विसर त्यांना पडू नये ही माझी त्यांना सूचना असल्याचे आमदार राजन साळवी म्हणाले.