उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे : अभिजीत बिचुकले

सातारा : कवी मनाचे नेते अशी ओळख असलेले आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचुकलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.
अभिजित बिचुकले यांनी आपली उमेदवारीचा घोषणा करताना खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार हे स्पष्ट केले. 2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदारराजा जागृत झाला पाहिजे असे अभिजित बिचुकलेंनी म्हटले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचकुलेंनी प्रस्थापित राजकारण्यांना लावला.
अभिजित बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सल्लाही बिचुकलेंनी दिला. या लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक पाठपुरावा करणार असल्याचे सांगत बिचुकलेने रणशिंग फुंकले. मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिलला अर्ज भरणार असल्याची घोषणा बिचुकलेंनी केली.
अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजेंवर टीका केली. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे असे आवाहन बिचुकलेंनी केले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी मी केली होती. समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.पण, स्मारकाची एक विटही रचली नसल्याची टीका बिचुकलेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा असे आवाहन बिचुकलेंनी केले.
शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. अभयसिंह महाराज यांचेही खच्चीकरण शरद पवार यांनी केले. योग्य वेळ की त्यांच्यावर बोलणार असल्याचे अभिजित बिचुकले यांनी म्हटले. मी या लढाईत एकटा लढत असून लोकांनी पाठिशी उभे राहण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले.