
कराड ः शेणोली स्टेशन येथून चोरीस गेलेली हिरो होंडा दुचाकी कराड तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांची जप्त केली. या प्रकरणी एकास अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
मनोज रतनचंद ओसवाल (वय 52) रा. शुक्रवार पेठ कराड असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेणोली स्टेशन येथून 21 जानेवारीला दुचाकी चोरीस गेली होती. ती शेणोली येथील सोनहिरा पेट्रोल पंपावर पार्क केली होती. याप्रकरणी दिलीप यशवंत कणसे (रा. विंग) यांनी चोरीची तक्रार कराड तालुका पोलिसात दिली होती. पोलिस अधीक्षक अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दुचाकी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, वाहतुक विभागाचे प्रकाश कारळे यांनी त्याबाबतचा तपास केला. त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात मनोज ओसवाल ती दुचाकी घेवून जाताना आढळून आला होता. त्यास पकडून पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून संशितास अटकही केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शंकर गडांकुश करीत आहेत.