
कराड ः कापील विकास सेवा सोसायटी शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण, व ज्येष्ठ सभासद सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा.चेअरमन शिवाजी जाधव, चे बाजार समिती सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण. कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, ॲड. शंकरराव लोकरे, चेअरमन दीपक जाधव, जगन्नाथ मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, कापील विकास सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व कालखंडात झाली असून संस्थेने जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. संस्थेचा खत विभाग, धान्य विभाग, अत्यंत काटकसरीने चालवून सभासदांना उत्तम सेवा दिलेले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल पाच कोटीची असून संस्थेने चांगला नफा मिळवलेला आहे. संस्थेला ज्येष्ठ सभासदांचे अचूक मार्गदर्शन लाभलेने संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेने कापील गाव हे तरकारी पिके जास्त प्रमाणात घेतली जातात त्यासाठी कमी कालावधीचे कर्ज वितरण करणे बाबत संस्थेने जिल्हा बँकेशी विचार विनिमय करून शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, संस्थेत कमीत कमी राजकारण आणून संस्था प्रगतीपथावर ठेवावी असे आवाहन केले.
यावेळी प्रकाश पाटील सुपने, विजयकुमार कदम, प्रा. धनाजी काटकर सर, शिवाजी जाधव दुशेरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पिनु जाधव यांनी केले.
कार्यक्रमास कोयना दूध संघाचे संचालक, कराड खरेदी विक्री संघाचे संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती संचालक, कोयना बँक संचालक व कापील गावातील ज्येष्ठ नागरिक संस्थेची सभासद उपस्थित होते.