ताज्या बातम्याराजकियराज्य

महाविकास आघाडीला मोठा धक्का, मित्र पक्षाने सोडली साथ

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणूक 2024 चा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. देशात 7 टप्प्यात मतदान होणार असून राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे. राज्यात भाजपने आघाडी घेत आपले 20 उमेदवार जाहीर केले आहेत.
असं असताना महाविकास आघाडी अद्याप एकही उमेदवार जाहीर करू शकला नाही. दुसरीकडे आघाडीतील एकएक मित्रपक्ष सोडून जाताना दिसत आहे. आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही वेगळी भूमिका घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सर्वांना आवाहन केलं आहे.

राजू शेट्टी यांनी आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. महाविकास आघाडीने हातकणंगले मधून उमेदवार देऊ नये तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मविआसमोर ठेवला आहे. महाविकास आघाडीमध्ये येण्यास किंवा मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, मी महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही हे 100% खरं आहे. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. हातकणंगलेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष आणि इतर अशी लढाई सुरू आहे. हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आली असं मी ऐकलं. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा, मी ती जागा सहज जिंकू शकतो, या संदर्भात मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मला आला होता. पण मी म्हटलं मागील 25 वर्ष मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा माझा विचार नसल्याचं मी त्यांना सांगितला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. माझ्या प्रस्तावावर विचार लवकरच करू असं त्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील काही धोरणांवर मला आक्षेप आहे, 2022 मध्ये मी आघाडी सोडली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जेव्हा धोरण आखली जातात तेव्हा आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. आमचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल नाही. शेतकऱ्यांबाबतची त्यांची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही सहा जागा लढवण्याची तयारी केलेली आहे. तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर सोडलेला आहे. जर आम्हाला महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा दिला तर किती जागा लढवायच्या किंवा कोणत्या पक्षाला मदत करायची ते त्यावेळी आम्ही ठरवू.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close