दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार
शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असिम सरोदे यांना पाठविली नोटीस

मुंबई : शिवसेनेचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा ऍडव्होकेट असिम सरोदे यांनी केला होता. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला होता. चंदपूर येथील ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना त्यांनी याबाबतचे विधान केले होते. तसेच या आमदारांची यादीही असिम सरोदे यांनी वाचू दाखवली होती.
याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून असिम सरोदे यांनी नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार, असे या या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.