
कराड : जखिणवाडी, ता. कराड येथील दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील गुंडास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेवून जेरबंद केले. मंगळवार, दि. 19 रोजी ही कारवाई करण्यात आली.
पृथ्वीराज बळवंत येडगे (वय 29) रा. जखिणवाडी (बिरोबा मंदिर) ता. कराड असे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेल्याचे नाव आहे.
याबबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहरातील तडीपार इसमांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार वपोनि के. एन. पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांची सदर कामगिरीसाठी नियुक्ती केली.
मंगळवार, दि. 19 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना त्यांच्या बातमीदार मार्फत जखिणवाडी, ता. कराड येथील दोन वर्षांसाठी तडीपार असलेला इसम पृथ्वीराज बळवंत येडगे हा त्याठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व त्यांच्या पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने बिरोबा मंदिर जखिणवाडी सापळा रचून तडीपार इसम पृथ्वीराज येडगे यास ताब्यात घेऊन अटक केले. तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस ना. कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी केली.