ताज्या बातम्याराजकियराज्य

शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे : सुनेत्रा पवार

पुणे : मी शेतकऱ्यांची मुलगी आणि शेतकऱ्यांचीच बायको आहे. सतत शेतकरी कुटुंबात वावरल्याने शेतकऱ्यांच्या जाणीवा आणि शेतकऱ्यांची कळकळ मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन.

तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन, असा विश्वास बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार सुनेत्रा पवारांनी दिला. सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत..त्यांच्या प्रचारार्थ रूपाली चाकणकर, राहुल कुल, कांचन कुल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार रमेश थोरात मैदानात उतरले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासोबत ते दौंड तालुक्याचा गावभेट दौरा करीत आहेत.

महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रा वहिनी पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांचा अडचणीत लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ही निवडणूक कौटुंबिक नाही. ही देशाची निवडणूक आहे. उज्ज्वल भारतासाठी आपण एकत्र आलो आहोत.मी शेतकऱ्यांची मुलगी आणि बायको आहे. मला शेतीचे प्रश्न जवळून माहिती आहे. विकास करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे आहेमला पाठींबा द्यावा अशी विनंती करते.येणाऱ्या काळातील जबाबदारी पार पाडेल अशी खात्री देते.

महायुतीने मोठ्या विश्वासाने बारामतीची उमेदवारी दिली आहे. बारामतीचा झालेला विकास आपण पाहिला आहे. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. बारामती सोबतच देशातासाठी आपण मतदान करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मताची गरज आहे. तुम्ही विकासाला मतदान कराल ही खात्री आहे आणि तुमचा विकास मी नक्की करेन, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी उपस्थितांना दिला.

दौंड विधानसभा मतदारसंघात रावणगाव येथे रावणगावसह मळद, नंददेवी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेकतरी महायुतीच्या माध्यमातून नेतेमंडळींची झालेली एकजूट पाहून येथील वातावरण उत्साही दिसत. त्याच उत्साहाने “घड्याळा”ला मतदान करून महायुतीला मताधिक्य द्या, अशी विनंती ग्रामस्थांना केली, असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार निधीतून देखील या परिसरात विकासकामे व्हावीत, अशी ग्रामस्थांनी मागणी केल्याचंदेखील त्या म्हणाल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close