ताज्या बातम्याराज्य

ग्राहकांना 12 एलपीजी गॅस सिलिंडरवर मिळणार 300 रुपये सबसिडी

नवी दिल्ली : सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत कोट्यवधी जनतेला एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळेल. ही सबसिडी 300 रुपये असेल. वर्षभरातील केवळ 12 सिलेंडरवरच सबसिडीचा लाभ मिळेल. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अर्थातच तुम्ही उज्ज्वला योजनेशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, उज्ज्वला योजनेचे देशात 9 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत.

गेल्या मार्च महिन्यात, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होती. आता ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने इंधनाचे भाव वाढल्यानंतर मे 2022 मध्ये उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी सुरु केली. ऑक्टोबर 2023 मध्ये सबसिडी 300 रुपयांची करण्यात आली. ही सबसिडी प्रति वर्ष 12 एलपीजी सिलेंडर मिळते. आता ती पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जवळपास 10 कोटी कुटुंबांना लाभ होण्याची आशा आहे. त्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे किंमती 900 रुपयांच्या आत आल्या आहेत. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच, लोकसभा निवडणुकीनंतर समोर येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close