म्हातारा लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय ; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर सडकून टीका

माढा : तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना देत नाहीत असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. माढा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत बोलत होते..
सदाभाऊ खोत म्हणाले, बाप मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आले की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? म्हणून दादा विकासासाठी महायुतीमध्ये आले.
ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक गोष्टी ऐकायला येतील. साहेबांचे वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. पण तुम्हीच मला सांगा सध्या साहेबांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत का? की जनावारांना पाणी पाजायचय? सध्या त्यांचा धंदाच हा आहे. या वयात देखील आमच्या सारख्यांन संधी दिली जात नाही, अशी खंत देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.