क्राइमराज्यसातारा

कराड शहर परिसरातील रेकॉर्डवरील गुंड एक वर्षाकरीता स्थानबद्ध

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांकडे पाठवला होता प्रस्ताव

कराड ः कराड शहर व परिसरात चोरी, दरोडा, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या एका रेकार्डवरील गुंडास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले.

कुंदन जालींदर कराडकर (वय 27, रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर, ता. कराड) असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदन कराडकर हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याने कराड शहर व परिसरात स्वतः व साथीदारांच्या मदतीने मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहीत चोरी, दरोडा, अपहरण, शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, दमदाटी, मारामारी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे नोंद आहेत. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी कुंदल कराडकर याचे विरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी पडताळणी करून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्फतीने एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार कुंदन कराडकर याच्याकडून सार्वजनिक शांततेत बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व त्याच्याकडून अनेकांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याची खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी एक वर्षाकरीता कुंदन कराडकर याची जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश पारीत केला असून त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर, पाटण डीवायएसपी सविता गर्जे, स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे, पोलीस हवालदार अमित सपकाळ, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.

दीड वर्षात 128 जणांवर कारवाई

नोव्हेंबर 2022 पासून 10 मोक्का प्रस्तावामध्ये 128 जणाविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत म.पो.का. कलम 55 प्रमाणे 25 उपद्रवी टोळ्यांमधील 81 जणांना, म.पो.का.कलम 56 प्रमाणे 26 जणांना, म.पो.का.कलम 57 प्रमाणे 3 जणांना असे एकूण 110 जणांना तडीपार सारखी तसेच एमपीडीए कायद्यान्वये दोघांजणाविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. भविष्यातही सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सराईत गुनहेगारांचेविरूद्ध मोक्का, हद्दपार, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close