पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली : सरकारची पीएम किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा १७ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमी होणार आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांनी २१,००० कोटींहून अधिक रुपयांचा हप्ता जाहीर केला होती. पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता ९ कोटींहून अधिक लोकांना देण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा १६ वा हप्ता देण्यात आला होता. यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १७ वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे ४ जूननंतर पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये मिळतात. या योजनेत लाभार्थींना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. हे पैसे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट- नोव्हेंबर आणि डिसेंबर- मार्च या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जातात.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन eKYC करता येईल. बायोमॅट्रिकच्या आधारे तुम्ही केवायसी करु शकतात.