
कराड : मलकापूर येथील नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेबद्दल रोज नवनवीन अपडेट मिळत आहेत मुळात ही नियोजित संस्था घश्यात घालण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. मुळातच या संस्थेची उपनिबंधक कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी नाही. पोलिसांनी तक्रारदाराच्या अर्जावरून गुन्हा नोंद करून सुमारे आठ जनावर गुन्हा नोंद केला मात्र त्यातील दोघांनाच अटक करण्यात आली उर्वरित लोकांना अटक का केली नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जर तक्रारदार दयानंद बाबासाहेब गोरे यांच्या तक्रारीवरून जर हा सगळा कारभार चालत असेल तर पोलिसांनी यामध्ये काय तपास केला हेही पहावे लागणार आहे. जर पोलीस तक्रारदाराच्या बाजूने कल देत असतील तर हा उर्वरित सभासदांवर अन्याय तर नाही ना हे ही जाणून घेतले पाहिजे. कारण दयानंद बाबासाहेब गोरे जे तक्रारीत सांगतायत मधुकर चवरे यांनी आपल्या सभासद पदाचा राजीनामा दिला तर मधुकर चवरे सांगत आहेत मी सभासद पदाचा राजीनामा दिलेला नाही यामध्ये काहीतरी पाणी मुरतंय असा संशय कराडकर यांच्या मनात आहे.
नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित कराड ही संस्था उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांच्याकडे या संस्थेची नोंदणी नाही यामुळे उपनिबंधक कार्यालयाकडे या नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था कराड या संस्थेशी संबंधित असणारे सभासदांची संख्या सभासदांची असणारी संपूर्ण माहिती, संस्थेचे झालेले सर्व ठराव, तसेच संस्थेने केलेले ऑडिट त्याचे रिपोर्ट व संस्थेबाबत काही त्रुटी याबाबतची कोणतीही माहिती मिळू शकत नाही. नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था नाही तर या संस्थेच्या झालेल्या सभा त्यांनी केलेले ठराव तसेच त्या संस्थेचे असलेले लेटर पॅड व शिक्के हे अधिकृत असू शकतात का? हा महत्त्वाचा विषय आहे.
दयानंद बाबासाहेब गोरे यांनी कराड शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी अर्जावरून या पुढील व्यक्तींच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मधुकर आनंदा चवरे, काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, भानुदास शंकर लोहार, दीपक रामचंद्र भंडलकर, उत्कर्ष वासुदेव आठल्ये, शंकर रामचंद्र शिंगाडे, गजानन विनायक कुलकर्णी, पुष्पा अर्जुन कदम यांनी नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्था कराड यांच्या मालकीची सर्वे नंबर 171/17 ई ही मिळकत स्वतःच्या आर्थिक फायदा करता हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर सभा घेऊन, बनावट सभासद यादी बनवून, बनावट प्रोसेसिंग, बनावट ठराव बनवून, त्यावर सदर नियोजित संस्थेच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नसताना त्या बनावट कागदपत्राचा वापर विविध शासकीय कार्यालयामध्ये करून नियोजित संस्थेची फसवणूक केली आहे म्हणून माझे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच दयानंद बाबासाहेब गोरे यांचे असे म्हणणे आहे की मधुकर आनंदा चवरे, यांनी दि. 7 – 1 – 1981 साली नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मधुकर चवरे यांच्या नावाचे सभासद सोडत असल्याबाबतचे पत्र असून त्या पत्रावरती तिकीट लावलेले असून त्यावरती सही केलेली आहे. ते पत्र दयानंद गोरे यांनी ठिकठिकाणी दाखल केलेले आहे. परंतु मधुकर चवरे यांनी विविध ठिकाणी चालू असलेल्या केसेस मध्ये दिलेल्या लेखी म्हणण्यामध्ये मी या संस्थेचा राजीनामा दिलेला नाही. तसेच भाग भांडवल रक्कम कोणाकडूनही केव्हाही परत घेतलेली नाही त्यासंबंधी कसलेही पावती स्वतः करून कोणासही दिलेली नाही व त्यासंबंधी कसलाही ठराव संस्थेमध्ये झालेला नव्हता. असे त्यांनी लेखी दिलेले आहे. मग प्रश्न असा पडतो की खरंच मधुकर चवरे यांनी राजीनामा दिला आहे का जर त्यांनी राजीनामा दिला नसेल तर ते पत्र कोणी लिहिले आहे व त्यावरील सही कोणाची आहे. तसेच मधुकर चवरे यांनी या संस्थेच्या सभासद पदाचा राजीनामा दिला आहे असा कोठे जबाब दिलेला कागद दाखल केलेला आहे का? याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करताना तपाशी अधिकारी यांनी काही शहानिशा केलेली आहे का? की तक्रारदार सांगत आहेत म्हणून मधुकर चवरे यांनी राजीनामा दिलेला आहे असे गृहीत धरण्यात आलेले आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील भागात – नियोजित संस्थेच्या जमिनींच्या मृत्युपत्राबाबत