
कराड : गौणखनिज मधील महाभागाचे कारनामे
गौणखनिज म्हटलं की, सर्वप्रथम माती, मुरूम, दगड याचा विषय येतो. गौणखनिज मध्ये शासनाने काही ठराविक समाजासाठी आदेश जीआर काढून अटी व शर्ती घालून या समाजातील गरजू लोकांच्यासाठी विना रॉयल्टीचा ठराविक कोटा गौण खनिज उत्खननासाठी दिला आहे.
त्यातील पारंपारिक दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजासाठी महाराष्ट्र जमीन महसूल 1966 चा महा. 41 मधील कलम 22 अन्वये वर्षाला 200 ब्रास उत्खनन करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र दिले जातात.
तहसील कार्यालयातून ही ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी समाजातील गोरगरीब गरजू लोकांच्यासाठी काही संघटना व समाजसेवक धडपड करून त्यांना प्रामाणिक मदत करतात.
परंतु हा महाभाग स्वतःचा, मुलाचा, वडिलांचा व आपल्या जवळचे पाहुणे यांच्यासाठीच मदत करतो. त्याला समाजाचे काहीही देणे घेणे नाही. त्याला फक्त आपल्या भातावर डाळ कशी ओढता येईल हेच तो तहसील कार्यालयाच्या पायऱ्या वरती उभा राहून बघत असतो. या महाभागाने समाजाच्या नावाखाली स्वतःचा व घरच्यांचा फायदा करून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महाभागाने स्वतःचा, मुलाच्या, व वडिलांच्या नावाने दगड उत्खनन करण्यासाठी परवानगी मागितली आहे. परंतु या महाभागाला समाजातील गरीब गरजू लोक दिसले नाहीत.
या महाभागावरती जेव्हा कारवाई करण्यात आली त्यावेळीस या कारवाईतून फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी याने संघटनेच्या नावाखाली तक्रारी अर्ज दिले उपोषण केले ही स्वतःसाठी होती समाजासाठी नव्हती. या महाभागाने हित सेवा नावाची संघटना काढली. या संघटनेचा तो अध्यक्ष आहे त्याने या संघटनेच्या नावाखाली त्याच्या लेटर पॅडवरती प्रशासनावरती दबाव तंत्र वापरण्यासाठी फक्त तक्रारी केल्या.
या महाभागाने या संघटनेच्या नावाखाली समाजातील किती लोकांना मदत केली. त्यांना किती रोजगार उपलब्ध करून दिले. हे त्याने दाखवून द्यावे. अन्यथा ही संघटना स्वतःचे हित पाहण्यासाठी काढलेली संघटना होती असे समजावे.
या महाभागाने केलेल्या तक्रारी काढलेली संघटना व केलेली उपोषणे जर ही समाजाच्या लोकांच्या हितासाठी होती किंवा त्याचा समाजातील लोकांना फायदा झाला असेल तर त्याचा फायदा समाजातील किती लोकांना झाला त्याने हे प्रसारमाध्यमासमोर जाहीर करावे असे काही लोकांचे व समाजसेवकांचे म्हणणे आहे.
अशा या महाभागाच्या गौण खनिज बरोबर नांदलापूर, जखिनवाडी, पाचवड फाटा, ओगलेवाडी, सातारा येथील अनेक भानगडीचा परदा फाश काही समाजसेवक लवकरच करणार आहेत.
क्रमश :