ताज्या बातम्याराजकियराज्य

सूर्या लॉज मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कराड : लॉजच्या खोलीत पंख्याच्या हुकला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. शहरातील सूर्या लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

प्रथमेश विकास पवार (वय २४, रा. आंबेगाव, ता. जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे राहणारे अभिषेक सिद्धप्पा अंकलगी हे शहरातील सूर्या लॉज चालवितात. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रथमेश पवार हा युवक संबंधित लॉजमध्ये आला. त्याने लॉजमधील २११ क्रमांकाची खोली भाडेतत्त्वावर घेतली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने हॉटेलच्या रेस्टॉरंटमधून नाश्ता आॅर्डर केला. रात्री तो त्याच्याच रूममध्ये होता. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लॉजमध्ये चेकआउट करीत असताना अभिषेक अंकलगी आणि लॉजचे व्यवस्थापक निलेश साळुंखे या दोघांनी प्रथमेश पवार याच्या खोलीची बेल वाजवली. वारंवार आवाज देऊनही आतून कसलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्या दोघांनी खिडकीची जाळी काढून आत पाहिले असता प्रथमेश पवार याने खोलीतील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

ही घटना निदर्शनास येताच अभिषेक अंकलगी यांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर उपनिरीक्षक पवार यांच्यासह कर्मचाºयांनी त्याठिकाणी धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. प्रथमेश पवार याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. याबाबत अभिषेक अंकलगी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close