
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यानंतर श्री. चव्हाण यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजीत मोहिते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा निलमताई येडगे, मराठा महासंघ सातारा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली जाधव, ओबीसी संघटना राज्य अध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा गितांजली थोरात, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, माजी सभापती रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.