कराड शहरात लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा

कराड : कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी महायुती शासनाकडून तब्बल ९६.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीमुळे, क्रिडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निधीबद्दल कराड शहरातील दत्त चौकात क्रिडाप्रेमी नागरिक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाडूवाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, ऑलम्पिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, उमेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, नितीन वास्के, विनायक घेवदे, रमेश मोहिते, समाधान चव्हाण, किरण मुळे, अभिषेक भोसले, प्रमोद शिंदे, लुकमान नदाफ यांच्यासह कार्यकर्ते व क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.