कृषीराज्यसातारा

सह्याद्रि साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशनचा पुरस्कार जाहिर 

देशातून सर्वाधिक साखर निर्यातीबद्दल गौरव

कराड : नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह शुगर फैक्टरीज, नवी दिल्ली या सहकारी साखर कारखान्याच्या शिखर संस्थेच्यावतीने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. व त्या आधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध बाबीत उत्कृष्ठ काम करणाऱ्या साखर कारखान्यास पारितोषिके जाहिर करण्यात येतात. व त्या कारखान्याचा गौरव करण्यात येतो. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन २०२२-२३ वर्षामध्ये देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा देशपातळीवरील व्दितीय क्रमांकांचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांनी कळविले असल्याबद्दलची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
कार्यकारी संचालक यांनी पुढे सांगितले की, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकार व पणन मंत्री यांचे उत्कृष्ठ नियोजन व मार्गदर्शनामुळे आजवर कारखान्यास सन २०११-१२, २०१२-१३, २०१५-१६, २०१६-१७ व २०१९-२० सालाकरीता उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचे प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व यंदा सन २०२२-२३ सालाकरीता जास्तीत जास्त साखर निर्यातीचा देशपातळीवरील पुरस्कार चौथ्यांदा प्राप्त झालेला आहे. कारखान्याने या चारही सालात निर्यात केलेल्या मोठ्या क्वांटिटीच्या साखरेस देशातर्गत त्या- त्या वेळीच्या बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळालेला आहे. या मोठ्या प्रमाणावरील निर्यातीमुळे देशास परकीय चलन उपलब्ध करण्यात कारखान्याची मदत झालेली आहे. याशिवाय सन १९८८-८९ मध्ये उच्चत्तम तांत्रिक पुरस्कार, सन १९९८-९९ मध्ये केन डेव्हलपमेंट अॅवॉर्ड असे नॅशनल फेडरेशन व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार कारखान्यास प्राप्त झालेले आहेत.
सन २०२२-२३ सालासाठी जास्तीत जास्त साखर निर्यातीचा व्दितीय क्रमांकांचा पुरस्कार वितरण समारंभ माहे ऑगस्ट, २०२४ मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे.
सदर पुरस्कार कारखान्यास मिळालेबद्दल मा. सभासदांचेकडून कारखान्याचे चेअरमन मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close