
कराड : कराड तालुक्यात महसूल खात्यामध्ये मलकापूर मंडल, शेणोली मंडल, व उंब्रज मंडल मध्ये मंडल अधिकारी म्हणून काम करण्यासाठी नेहमीच रस्सीखेच बघायला मिळते. त्याचे कारण हे तसेच आहे. शेणोली मंडल मध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर व्यवसाय व खानपट्टे आहेत. तर उंब्रज मंडल मध्ये वीट भट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तर मलकापूर मंडल मध्ये नांदलापूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर व्यवसाय व खानपट्टे मोठ्या प्रमाणात होते. परंतु, काही कारणामुळे ते बंद पडलेले आहेत. काही मंडल अधिकारी यांनी कराड तालुक्यात मंडल अधिकारी म्हणून काम केले आहे. परंतु, एकतर त्यांची बदली दुसऱ्या तालुक्यात झाली, नाही तर ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांना या तिन्ही मंडल मध्ये काम करण्याची संधी कधी मिळालीच नाही. पण काही मंडलाधिकारी यांच्या नशिबात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या तिन ही मंडल मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
वीट भट्टी व्यवसाय असो अथवा क्रेशर व्यवसाय असो तसेच काही ठिकाणी भरावा करण्यासाठी लागणारा मुरूम असो यासाठी गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी प्रशासनाकडून काही अटी शर्तीचे जीआर तसेच परिपत्रके काढलेली आहे.
गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी महसूल खात्याकडून परवानगी घ्यावी लागते. महसूल खात्याकडून परवानगी आदेश देता वेळेस या आदेशामध्ये काही अटी शर्ती घातलेल्या असतात. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून अटी शर्ती घालून दिलेल्या आदेशांना काही तलाठी व मंडलाधिकारी केराची टोपली दाखवतात असा अनुभव कराड महसूल विभागात आला असल्याचे दिसत आहे.
उंब्रज मंडल मध्ये 53 वीट भट्ट्या आहेत. त्यातील 52 वीट भट्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार या वीटभट्टीसाठी लागणारी लाल माती उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी तहसील कार्यालयातून आदेश देण्यात आले होते. ते आदेश देताना यामध्ये काही अटी व शर्ती घातल्या होत्या. त्यामध्ये वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना Gps प्रणाली बसवून कार्यान्वित केल्यानंतरच त्या वाहनाने गौण खनिजाची वाहतूक करणेचे अटीवर सदर परवाना मंजूर करणेत येत आहे असे अटी शर्ती मध्ये नमूद आहे. तसेच तहसील कार्यालयातून दिलेल्या या आदेशाची एक प्रत उंब्रज मंडल अधिकारी यांना देण्यात आली आहे.
जर माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांना Gps प्रणाली बसवली नाही तर त्यांनी किती ब्रास माती उत्खनन केली आहे याबाबत कोणतीही माहिती वरिष्ठ कार्यालयास मिळणार नाही. मंडल अधिकारी जो पंचनामा करून देतील तोच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायचा का ? असे असतानाही मंडल अधिकारी यांनी कोणत्या अधिकाराने व कोणाच्या आदेशाने वाहनांना Gps प्रणाली न वापरता गाळ वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली.
जर याबाबत मंडल अधिकारी यांना कोणतीच कल्पना नव्हती तर त्यांनी माती वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई का केली नाही. याबाबत उंब्रज मंडल अधिकारी यांची योग्यती चौकशी करण्याची मागणी काही सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.
क्रमशः
पुढील भागात उंब्रज मंडल अधिकारी यांच्याकडे शक्तिमान पेक्षाही मोठी जादुई पावर…