
कराड : कराड तालुक्यातील कापिल–कटपानमळा येथील रस्त्याच्या कामावरून सध्या संतापाची लाट उसळली असून विकासकामाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. शासनाच्या निधीतून होत असलेल्या या कामामध्ये नियम, दर्जा आणि तांत्रिक निकषांना जणू काही हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांच्यामध्ये काही ‘साठे-लोटे’ तर नाहीत ना, अशी शंका आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. नागरिकांच्या करातून उभ्या राहणाऱ्या निधीचा असा अवमान होत असेल, तर हा प्रश्न केवळ एका रस्त्याचा नसून लोकांच्या हक्कांचा असल्याची भावना परिसरात तीव्र होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या कामादरम्यान बंदिस्त पाईपलाईन आणि चेंबर्स थेट डांबरीकरणाच्या खाली गाडून टाकण्यात आले असून त्यावरच डांबरी रस्ता टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही तांत्रिक निकषांनुसार अशी पद्धत स्वीकारार्ह नसतानाही हे काम पूर्ण करण्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रकारचे काम अधिकारी पाहत असताना देखील ते दुर्लक्षित झाले असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळेच या कामामागे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदार यांच्यातील ‘साठे-लोटे’ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
याचबरोबर साधारण तीनशे फूट अंतरावरचा पूर्वीचा डांबरी रस्ता उकरून टाकण्यात आला असून तो आजतागायत व्यवस्थित करून देण्यात आलेला नाही. परिणामी त्या ठिकाणी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण काम, उघडा खड्डा आणि निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्यावर हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून ठरवून केलेल्या हलगर्जीपणाचा वाटू लागतो. अशा प्रकारचे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित होत असून पुन्हा एकदा अधिकारी-कॉन्ट्रॅक्टदार यांच्यातील ‘साठे-लोटे’ असल्याचा संशय बळावत आहे.
रस्त्याच्या कामामध्ये डांबरीकरणाची जाडी, वापरलेले साहित्य, तसेच पाईपलाईन व चेंबर्स संदर्भातील तांत्रिक बाबी या सर्व गोष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असणे बंधनकारक असते. मात्र कापिल–कटपानमळा येथील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या नियमांचे अक्षरशः उल्लंघन झाले असल्याचे दिसून येत आहे. जर काम निकृष्ट झाले असेल, तर त्याची जबाबदारी केवळ ठेकेदारावर ढकलून चालणार नाही; कारण कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांचीही असते. त्यामुळे या प्रकरणामध्ये अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यातील ‘साठे-लोटे’ असल्याची शंका अधिक गडद होत आहे.
विकासकामांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन कामे होत असतील, तर तो जनतेच्या पैशांवर चाललेला सरळसरळ अन्याय ठरतो. नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील गरजांचा विचार न करता केवळ कंत्राट पूर्ण झाल्याचा दिखावा करण्यासाठी असे काम केले जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. त्यामुळेच या कामामध्ये संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यात काही ‘साठे-लोटे’ आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, कापिल–कटपानमळा येथील या रस्त्याच्या कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असल्याने त्यामध्ये पारदर्शकता आणि दर्जा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यातील ‘साठे-लोटे’मुळे नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा संदेश समाजात जात राहील, अशी तीव्र भावना आता परिसरात व्यक्त होत आहे.
पुढील भागात – चेंबर्स डांबरी रोड खाली घालवले आहेत तसेच उखरलेला रस्ता पूर्ण केलेला नाही हे अधिकाऱ्यांना दिसेना..?

