
कराड : गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदुवरील अत्याचाऱ्याच्या घटना वाढत आहे. या विरोधात येथील सकल हिंदु समजातार्फे सर्व पक्षीय लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी जनआक्रोश मुक मोर्चा काढून बांग्लादेशचा जाहीर निषेध करण्यात आला. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
बांगलादेश येथे हिंदु समाजावर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या सरकार विरोधात सकल हिंदु समजातर्फे मंगळवारी येथे मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात उपस्थितांनी काळ्या फिती लावून निषेधही केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुक मोर्चास प्ररांभ झाला. प्रांरभी ज्योत घेतलेला युवक, त्यामागे हिंदुवरील अत्याचाऱ्याचा निषेध करणारा फलक घेतलेल्या महिला, त्यानंतर मार्चात सहभागी युवक, नागरीक असे मोर्चाचे स्वरूप होते. मोर्चात कराड दक्षिण चे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची उपस्थिती होती. मुक मार्चा डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य मार्गाने गेला. ज्योतिबा मंदीर, कन्या प्रशाला, कमानी मारुती चौक, चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक मार्गे मोर्चा दत्त चौकात नेण्यात आला. यावेळी सकल हिंदु समजाने बांगलादेशातील घटनेचा निषेध केलेले निवेदन प्रशासनातर्फे नायब तहसीलदार बाबुराव राठोड यांनी तेथे उपस्थित राहून निवेदन स्वीकारले. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, विक्रम पावसकर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगात झाली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.