
कराड : विरवडे (ता.कराड) येथे पोलिसांनी छापा टाकून अनाधिकृत गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गणेश नामदेव साळुंखे (वय 40 या विरवडे) याच्यासह 27 भरलेले गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल महेश शिंदे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरवडे येथील रेल्वे गेट नजीक असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अनाधिकृत गैस सिलेंडर टाक्यांचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना मिळाली. त्यानुसार डिवायएसपी अमोल ठाकूर व पोलिस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार, महेश शिंदे व पोलिस हवालदार मुळे यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता छापा टाकला. यवेळी पोलिसांना सुमारे 22 हजार 410 रूपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलेंडर मिळून आले. गॅस सिलेंडरसह गणेश साळुंखे यास पोलिसांनी ताब्यात घतले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.