
कराड : वर्ग 2 च्या जमिनीमध्ये काहीही हस्तांतर करण्याचे झाल्यास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी असल्याशिवाय त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.
तसेच वर्ग 2 च्या जमिनीमध्ये काही हस्तांतर करण्याचे झाल्यास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. याबाबत कराड तालुक्यातील वर्ग 2 च्या जमिनीमध्ये हक्क सोडपत्र, मॉर्गेज, मृत्युपत्र, खरेदी-विक्री करायची झाल्यास तहसीलदार कराड यांना अर्ज करावा लागतो. तो अर्ज संबंधित टेबल वरती गेल्यानंतर त्यांच्या आवक जावक च्या वहीमध्ये नोंदवला जातो. त्यानंतर त्या अर्जाबरोबर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तहसीलदार यांच्याकडून परवानगी दिली जाते (थम रिलीज केला जातो). त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात पुढील काम केले जाते.
असे असताना मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांचे अर्ज आलेले नसताना जर अर्ज आले असते तर त्याची नोंद रजिस्टर ला दिसून आली असती. परंतु रजिस्टरला नोंद नाही याचा अर्थ ते अर्ज तहसील कार्यालयामध्ये आलेले नसताना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गटांचे थंब रिलीज कसे काय झाले याबाबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी हे लक्ष घालून योग्य ती चौकशी करणार का?
तसेच कराड तहसील कार्यालयात जी व्यक्ती अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वागत आहे. त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे काम करण्यासाठी नेमणूक आदेश नसतानाही त्याच्याकडून वर्ग 2 च्या जमिनीसाठी परवानगी देण्यासाठी (थम रिलीज करण्यासाठी) कोणत्या अधिकाराने काम करत आहे याचे नवलच आहे. तसेच त्या व्यक्तीकडून गोरगरीब लोकांना परवानगीसाठी 15 दिवस वाट पाहत बसावे लागत आहे. त्याला फोन केला तरी तो कोणाचेही फोन उचलत नाही अशा तक्रारी सध्या तहसील कार्यालयात सुरू आहेत तो तिराईत इसम असल्याने त्याच्यावरती कोणताही फरक पडत नाही. परंतु, सामान्य लोकांचे वर्ग 2 च्या परवानगीसाठी जे हाल होत आहे त्याला जबाबदार कोण?
तसेच वर्ग दोन च्या परवानगीसाठी अर्ज किती आले व थम किती रिलीज झाले याबाबत योग्य ती चौकशी व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार होणार असल्याची चर्चा तहसील आवारात सुरू आहे.
क्रमशः