
कराड : वर्ग 2 च्या जमिनी बाबत कोणतेही हस्तांतरण करायचे झाल्यास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. परवानगी नसेल तर हक्क सोड, मृत्युपत्र, मॉर्गेज, खरेदी-विक्री यासारखे कोणतेही दस्तावेज दुय्यम निबंध कार्यालयात करता येत नाही. यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करून परवानगी घेतल्या नंतरच या सर्व गोष्टी करता येतात.
यासाठी अर्जदाराने तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर तो अर्ज संबंधित टेबलला नोंद झाल्यानंतर सर्व कागदपत्राची पूर्तता असल्यानंतर परवानगी लगेच मिळत असे. या गोष्टीमुळे लोकांच्या मनामध्ये महसूल खात्याबाबतची भावना चांगली होती. परंतु, गेल्या एक वर्षापासून ज्या व्यक्तीचा महसूल खात्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना तहसील कार्यालयातील वर्ग दोन च्या जमिनीच्या परवानगीसाठी एका होमगार्ड कडे जबाबदारी देण्यात आली होती.
या होमगार्डने प्रथम सोज्वळ पणाचा आव आणला सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मने जपून त्यांच्या मनात चांगली भावना निर्माण केली. या व्यक्तीने अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर याला खात्री झाली की अधिकाऱ्यांना व लोकांना आपल्या शिवाय पर्याय नाही मग त्याने त्याचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली.
मुळात हा होमगार्डचे काम करत असणारी व्यक्ती याची महसूल खात्यामध्ये कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे आदेश नाही. परंतु लोकांची कामे लवकर व्हावी या अपेक्षेने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वर्ग 2 च्या जमिनीच्या परवानगी बाबत कामासाठी ठेवण्यात आल्याचे समजून येत आहे. परंतु याने सामान्य लोकांनी अर्ज केले तरी हा 15 ते 20 दिवस लोकांना परवानगी घेऊन देत नसे. लोकांनी त्याला फोन केला तरी तो कोणाचेही फोन उचलत नाही. याच्याबाबत लोकांनी तक्रारी केल्या. परंतु खाजगी इसम असल्याने त्याला याबाबत काहीही फरक पडत नव्हता. परंतु तो लोकांना अधिकारी सुट्टीवर आहेत. आज साहेब आलेले नाहीत. अशी अनेक करणे लोकांना देत असे. परंतु त्याच्या मर्जीतली अथवा त्याला खुश करणारी व्यक्ती असेल तरच त्याचे काम होत होते. जर लोकांनी त्याच्या मनासारखे केले नाही तर परवानगीसाठी लोकांनी वाटच बघत बसायचं.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांच्या अर्जांची कुठेही नोंद नाही अशा कितीतरी गटातील थम रिलीज झालेले आहेत. मुळात कराड तालुका हा दोन विधानसभा मतदार संघाचा तालुका आहे. कराड तालुक्यात शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बाहेरून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थीही खूप आहेत. अशातच महसूल खात्यात आपली नेहमीची कामे करून घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहिला मिळते. कराड तालुक्यात काम करताना तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांना तारेवरची कसरत करत काम करावे लागते. याचाच फायदा या व्यक्तीने घेऊन स्वतःची पोळी भाजून घेतल्याचे दिसून येत आहे.
वर्ग दोन च्या जमिनीच्या परवानगीसाठी किती अर्ज आले आहेत व किती परवानग्या घ्यायचे आहे हे फक्त त्या व्यक्तीस माहिती होते. तहसीलदार यांना दोन परवानग्या घ्यायच्या आहेत. असे सांगून तो त्यांच्या कडून दहा परवानग्या साठी थम रिलिज करून घेत असेल जर तसे नसेल तर अर्ज न आलेल्या गटांचे थम रिलीज कसे काय झाले याबाबत अधिकारीही अन्नभिन्न असतील.
तरी वर्ग दोन च्या जमिनी च्या परवानगीसाठी अर्ज किती आले व किती परवानग्या देण्यात आल्या याबाबत प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाली असून ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांनी याची योग्य ती चौकशी करावी अशी त्यांची भावना आहे.
क्रमश: