
कराड ः घोणशी (ता. कराड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डॉ. शशिकांत वायदंडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आमदार बाळासाहेब पाटील गटाच्या समर्थकांनी गुलालाच्या उधळणीने जल्लोष केला.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व “सह्याद्री“चे संचालक माणिकराव पाटील यांच्यासह सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घोणशी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी जानाई सह्याद्री ग्रामविकास पॅनेलने विजय मिळवून सत्तांतर घडवले होते. त्यानंतर सरपंचपदी सुवर्णा अडसुळे यांना, तर उपसरपंचपदी अनुक्रमे संजय पिसाळ, सुनीता पाटील यांना काम करण्याची संधी मिळाली होती. सुनीता पाटील यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी आज डॉ. शशिकांत वायदंडे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून संतोष जाधव यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक अंकुश टेंबरे यांनी सहकार्य केले.
नूतन उपसरपंच डॉ. वायदंडे यांचा “सह्याद्री“चे संचालक माणिकराव पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच अडसुळे व जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नूतन उपसरपंचांचे आमदार बाळासाहेब पाटील, माणिकराव पाटील, पी. डी. पाटील बँकेचे संचालक संभाजी पिसाळ, संजय पिसाळ, सरपंच सुवर्णा अडसुळे, संजय पिसाळ, सुनीता पाटील, रामचंद्र पिसाळ, विश्वासराव पिसाळ, अशोक जाधव, विलास पिसाळ, शिवाजी पिसाळ, निवासराव पाटील, दिनकर वायदंडे, बाळासाहेब वायदंडे, विकास वायदंडे, पंकज पिसाळ आदींनी अभिनंदन केले.