
कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पावर कंत्राटदारांकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले असून, या शिबिरामध्ये डेंग्यू आजाराबाबत प्राथमिक रक्त तपासणी, रक्तदाब व इतर चाचण्या करण्यात आले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पावर काम करीत असलेल्या कंत्राटदारांकडे उत्तर प्रदेश, बिहार अशा परराज्यातून कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचे काम उभ्या पावसातही गतीने सुरू आहे, पाऊसमान जास्त असल्याकारणाने सर्वांचे आरोग्य चांगले राहावे किंबहुना कोणासही कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये यासाठी संरक्षणात्मक खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मसूर यांच्या सहकार्याने, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. मैथिली मिरजे, डॉ. किशोर पाटील उपकेंद्र शिरवडे, सचिन वेल्हाळ, अरुण साळुंखे, व्ही.पी.देशपांडे, संदीप जाधव, लॅब टेक्निशियन आर. एस. जाधव यांचेसह यशवंतनगर येथील सर्व आशा सेविका यांनी हे शिबिर यशस्वी करणेसाठी सहकार्य केले.
या शिबिरास माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील (साहेब) यांनी भेट देऊन शिबिरार्थी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर पी.आर.यादव, चीफ इंजिनियर संग्राम पाटील, असि. लेबर ऑफिसर विकास चव्हाण, असि. वेल्फेअर ऑफिसर मनोज थोरात, संपर्क प्रमुख आर.जी.तांबे, विठ्ठल पाटील, आनंदराव बोराटे यांचेसह शिबिरार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.