
कराड ः मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका तर्फे 10 ऑगस्ट रोजी मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांची सातारा येथे होणाऱ्या शांतता रॅलीचे नियोजन करण्यासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये गावोगावी जाऊन 50 टक्के च्या आतून ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळणे संदर्भात जी रॅली आहे त्याची जनजागृती करणे आणि जरांगे पाटील साहेबांचे भूमिका सांगणे., कराड तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी आपल्या गावामध्ये जागृती करून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी भगिनीनी दहा तारखेला शांतता रॅलीसाठी सातारला बाहेर पडणेचे आणि नेण्याचे नियोजन करणे., कराड तालुक्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांचे आगमन झाल्यानंतर वारंजी फाटा येथे मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका आणि पाटण तालुका तर्फे त्यांचे स्वागत करणे., उंब्रज येथे मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांचे स्वागत करणे., आठ ऑगस्ट रोजी कराड दक्षिण व कराड उत्तर मतदार संघातील विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी तसेच 2019 साली विधानसभेला दोन व तीन नंबरची मते घेतलेले प्रत्येक पक्षाचे नेते यांना मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका तर्फे भेटून त्यांची मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळणे बाबत आणि सगेसोयरेचा अध्यादेश निघणे बाबत त्यांची भूमिका स्पष्ट विचारणे व स्पष्ट करून घेणे., आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
तसेच खासदार अनिल बोंडे यांनी मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना अपशब्द वापरले आणि मराठा समाजाचा अपमान केला त्याबद्दल त्यांचा या बैठकीमध्ये निषेध करण्यात आला. तसेच येणाऱ्या पुढील काळामध्ये अनिल बोंडे कराड तालुक्यामध्ये जेव्हा येथील तेव्हा त्यांना चपलाचा हार घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.