
कराड : ओगलेवाडी येथील राजवर्धन मंगल कार्यालयामध्ये हजारमाची गणातील प्रमुख कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी कराड उत्तर मध्ये परिवर्तन होणार असून मनोजदादा हे 2024 चे आमदार असतील असे सांगितले. यावेळी मनोजदादा घोरपडे, महेशबाबा जाधव, प्रकाश पवार, शिवाजी डुबल, विनोद डुबल, मनोज माने, अनिल पोळ,यांची प्रमुख उपस्तिती होती.
यावेळी चंद्रकांत मदने म्हणाले कराड उत्तर मध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असून मनोजदादांच्या रूपाने 2024 ला नवीन आमदार मिळणार आहे. मनोज दादांनी गेली बारा वर्षे कराड उत्तर मध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले असून यावेळी त्यांना त्याचे गिफ्ट म्हणून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. त्यासाठी आपण सर्व मावळ्यांनी एक दिलाने त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करूया.
यावेळी खरेदी विक्री संघांचे संचालक प्रकाश पवार म्हणले मनोजदादा यांचे सर्व सामावेशक नेतृत्व आहे. कराड उत्तर मध्ये ते सातत्याने काम करत आहेत. अशा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे.
यावेळी संभाजी कुंभार, अमोल माने, अरुण डुबल, बैलगाडी कमिटीचे अध्यक्ष उदय पाटील, माजी उपसरपंच सतीश पवार, पै. अतुल पवार, माजी सरपंच कुमार इंगळे, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पवार, राजू सूर्यवंशी, राकेश बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटील, अमोल पाटणकर, महेश जिरगे, बापू गांदले, निलेश डुबल, विरवडे गावचे उपसरपंच प्रफुल्ल वीर, माजी उपसरपंच सागर हाके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, बुरुड समाजाचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष विजयराव साळुंखे, विरवडेचे माजी सरपंच जावेद मुजावर, मन्सुर इनामदार, समीर मुजावर, अमर कांबळे, प्रसाद धोकटे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय जोशी, मनोज वीर, संदीप लोंढे, विकास सेवा सोसायटी माजी चेअरमन मोहनराव जाधव, पांडुरंग जाधव, कराप्पा पवार, वनवासमाची गावचे ग्रामपंचायत सदस्य मनोज माने, ग्रामपंचायत सदस्यअधिक पाटील, शरद अडके, गोरख आडके, विशाल कुंभार, पांडुरंग माने,पारले गावचे युवा नेते तुकाराम नलावडे, संदीप मदने, आदी मान्यवर उपस्तित होते.