राज्यसातारा

संगम सहकारी पाणीपुरवठा संस्थेची कौतुकास्पद कामगिरी : पांडुरंग चव्हाण 

कराड : संगम सहकारी पाणीपुरवठा संस्थेने खर्चात बचत करून संस्थेचा कारभार केला असून, संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग ‘ अ ‘ मिळत आहे. शिवाय संस्थेने ऑफिससाठी स्वतःची भव्य अशी वास्तू उभारली आहे. सभासदांना वेळेवर पाणी देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे, ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री पांडुरंग चव्हाण  यांनी मुंढे, ता. कराड येथील संगम सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक सभेत केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री अनिल हिंदुराव सुर्वे हे होते.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे सचिव श्री महादेव माळी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे तपशीलवार वाचन केले, सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची खुलासेवार उत्तरे सचिव श्री माळी यांनी सभेत दिली.
सभासदांना मार्गदर्शन करताना श्री पांडुरंग चव्हाण म्हणाले की स्वर्गीय आदरणीय पी.डी. पाटीलसाहेबांनी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून सहकारी उपसा जलसिंचन संस्थेची उभारणी करून हजारो एकर क्षेत्र बागायततीखाली आणले, या सर्व योजना आमदार बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या कार्यरत आहेत. सभासदांनी पाणीपट्टी भरून संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन केले.
माणिकराव पाटील म्हणाले की, सर्वसाधारण योजनेच्या पाण्यावर जोपासलेला ऊस गलितासाठी सह्याद्री कडे पाठवावा. चालू वर्षी पाऊसमान चांगले झाले आहे, तरी सभासदांनी योजनेवर जास्तीत जास्त उसाची लागण करावी असे सांगितले.
शेवटी महंमद आवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेस गोटे, मुंढे, वनवासमाची येथील संस्थेचे सभासद उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close