
कराड : जीवन कौशल्य शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची जडणघडणच होय, असे प्रतिपादन शिक्षण मंडळ कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी केले.
शिक्षण मंडळ, कराड संचालित कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट या शाखेमार्फत आयोजित जीवन कौशल्य विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहसचिव राजेंद्र लाटकर, लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम, कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंटचे संचालक सुधीर कुलकर्णी, आरती कुलकर्णी, अथर्व देशपांडे, सोनाली निकम, प्राची जाधव, स्नेहल पाटील व सोहम जाधव उपस्थित होते.
संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना चित्रकला, मातीकाम, क्राफ्ट संगीत, गायन, वादन, नृत्य, कराटे, लाटीकाठी, ऐतिहासिक शस्त्रांची ओळख, धनुर्विद्या, जर्मन भाषा, इंग्लिश स्पिकिंग, अभिनय प्रशिक्षण, योग व ध्यान, सुंदर हस्ताक्षर, मेहंदी, रांगोळी, ड्रोन तंत्रज्ञान, व्यक्तिमत्व विकास, फॅशन डिझाईनिंग, फेटा बांधणे, एआय तंत्रज्ञानाची ओळख, स्केटिंग, आपत्कालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण, संस्कारक्षम चित्रपट आदींचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले.
सात दिवसीय शिबिरामध्ये एकूण 58 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुधीर कुलकर्णी यांनी आभार मानले.