
कराड : कोतवालांना त्यांच्या सजा मध्ये काम करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिलेले असताना 22 कोतवालांना तहसील कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी त्यांचे आदेश का काढण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.
दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी मनु कुमार श्रीवास्तव अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी आपल्या कार्यालयात अथवा आपल्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा अन्य महसुली कार्यालयात कोतवालांच्या सेवा संलग्नित केलेल्या असल्यास कृपया सदर कोतवालांच्या सेवा संबंधित त्या त्या तलाठी सजा कार्यालयास त्वरित संलग्नित करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास त्वरित सादर करण्यात यावा असे पत्र विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना काढलेले आहे.
तसेच सातारा जिल्हा कोतवाल संघटना यांनी दिनांक 19 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना एक ते सात मुद्द्याबाबत निवेदन दिले होते. त्यामधील मुद्दा नंबर तीन मध्ये संबंधित कोतवाल कर्मचारी यांची सेवा मूळ सजात त्वरित वर्ग करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी महसूल यांनी दिनांक 28 मार्च 2024 रोजी सर्व तहसीलदार यांना पत्र काढून नियमानुसार उचित कार्यवाही करून त्याबाबत कोतवाल संघटनेच्या अध्यक्ष यांना लेखी अवगत करण्यात यावे व त्याची एक प्रत माहितीसाठी इकडील कार्यालयास सादर करण्यात येण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
तसेच दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी 22 कोतवालांच्या तहसील कार्यालयामध्ये नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. या नेमणुकीच्या आदेशामध्ये माननीय जिल्हाधिकारी सो सातारा यांच्याकडील कार्यालयीन कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. त्यानुसार कार्यालयातील दैनंदिन कामकाज विहित मुदतीत पार पडणे कामे कर्मचारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार कोतवालांनी तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याबाबत कोणतेही मार्गदर्शन दिलेले नाही. तसेच याबाबत कोणतेही मार्गदर्शन मागणी करण्यात आलेली नाही असा लेखी पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेला आहे.
मुळात जिल्हाधिकारी सातारा यांनी कोतवालांनी तहसील कार्यालय मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम करण्याबाबत कोणतेही मार्गदर्शन दिलेले नसताना तसेच याबाबत तसेच कार्यालयातून मार्गदर्शन मागणी केलेली नसताना दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी कोतवालांच्या नेमणुका केलेल्या आदेशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन नुसार असे नमूद करण्यामागचे कारण समजून येत नाही.
तसेच वरिष्ठनी कोतवालांनी त्या त्या सजा मध्येच काम करण्याबाबतच्या लेखी पत्रव्यवहार केलेला असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांचा आदेश न मानता कोतवालांची नेमणूक करणे कितपत योग्य आहे तसेच हे करण्यामागे कोणाचा फायदा व कोणाचा तोटा होतोय याबाबत तहसील आवारामध्ये चर्चा सुरू आहे.
क्रमशः