क्राइमताज्या बातम्यासातारा
कारच्या धडकेत सुपरवायझर ठार
पेरले गावच्या हद्दीतील घटना ः कारचालकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कराड ः पेरले ता. कराड गावच्या हद्दीत इंदोली फाटा ब्रिजवर भरधाव वेगात निघालेल्या कारने हायवे लेनवरील काम पाहणाऱ्या सुपरवायझरला जोराची धडक दिली. यामध्ये सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद जयप्रकाश मुलचंद साकेट (वय 24, रा. भुयाचीवाडी, ता. कराड, मूळ रा, हरय्या पोस्ट पोडी नोगर्डे ता.जि. सिंगरोली, राज्य मध्यप्र्रदेश) याने उंब्रज पोलिसात दिली असून याप्रकरणी कारचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुन्ना इकबाल पठाण (वय 38, रा. किवळ, ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे कारचालकाचे नाव आहे. तर दिलीप धोंडीबा पाटील (रा. पाटीलवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जयप्रकाश साकेट व सुपरवायझर दिलीप पाटील हे पेरले ता. कराड गावचे हद्दीत इंदोली फाटा ब्रिजवर बेगलोर ते पुणे जाणारे हायवे लेन वरील तिसऱ्या लेनचे वेल्डींगचे काम लाल बॅरीकेट लावुन करीत असताना भरधाव वेगात निष्काळजीपणो रस्त्याची परिस्थिती न पाहता आलेल्या कारने दिलीप पाटील यांना जोराची धडक दिली. यामध्ये पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने ते मयत झाले. याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.